सोलापूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; पोलीस अलर्टवर!

    02-Nov-2026
Total Views |
 
Solapur District Court
 Image Source:(Internet)
 
सोलापूर : सोलापूर Solapur जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा संदेश प्राप्त होताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात येत आहे. न्यायाधीश, वकील तसेच न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षिततेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आले आहे. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने तपासणीची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोठून आणि कोणी पाठवला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.