मुंबईतील कुर्ला गोळीबार प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    12-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई: कुर्ला परिसरात विनोद पवार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. हलाव पूल परिसरात तीन ते चार जणांनी विनोद पवार यांच्यावर गोळीबार केला होता. यावेळी दोन राऊंड फायर करण्यात आले, ज्यात पवार यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुंबई पोलिसांनी तपासासाठी १२ पथके तैनात केली होती.

दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींना पकडण्यात व्ही. बी. नगर पोलिसांना यश आले आहे. साकीनाका परिसरातून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. या हत्येत आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.