
Image Source:(Internet)
भिवंडीतील भादवड परिसरातील तलावात दोन अल्पवयीन मुले बुडाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत १२ वर्षीय आयुष मौर्य याचा बुडून मृत्यू झाला, तर अनिकेत नावाच्या दुसऱ्या मुलाला वाचवण्यात एका नागरिकाला यश आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, दोन्ही मुले तलावात बुडत असल्याचे CCTV फुटेज समोर आले आहे. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, संबंधित CCTV दृश्ये प्रसारित करताना मुलांची ओळख आणि संवेदनशील दृश्ये दिसणार नाहीत, यासाठी फुटेज ब्लर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.