
Image Source:(Internet)
सोलापूर : अक्कलकोटमध्ये सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील खासगी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकना भीषण आग लागल्याची घटना घडली. सुरुवातीला एका ट्रकला आग लागली. त्यानंतर आगीने शेजारी उभ्या असलेल्या ट्रकनाही कवेत घेतले. पाहता पाहता आगीचा भडका उडाल्याने आतापर्यंत जवळपास ५ ते ६ ट्रक जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
या खासगी पार्किंगमध्ये अद्याप अनेक ट्रक उभे असल्याने आग आणखी पसरण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.