गोकुळच्या राजकारणापेक्षा दूध उत्पादकांचे हित महत्त्वाचे; बावनकुळेंचे आवाहन

    10-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गोकुळ दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीतील राजकारण बाजूला ठेवून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संचालकांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो; मात्र गोकुळशी जोडलेल्या साडेपाच लाख कुटुंबांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. गोकुळ हा महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचा महत्त्वाचा पाया असून, तो अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

दरम्यान, कुही तालुक्यातील ससेगाव येथील गोपाळ समाजाच्या तीन वसाहतींमधील नागरिकांना घरांचे पट्टे आणि जन्मदाखले उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या समाजासाठी विशेष योजना तयार करण्यात आली असून, मार्चपर्यंत ७५ घरांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री या वसाहतीला भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिवाळीनिमित्त गोपाळ समाजातील नागरिकांसोबत फराळ वाटप आणि नातू अधिराजचा वाढदिवस साजरा केल्याचेही त्यांनी सांगितले.