सिनेसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    08-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही.

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर अर्थात नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावी अभिनेते म्हणून ओळखले जात होते. रंगभूमीपासून त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर १९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

‘सलाम बॉम्बे!’, ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘तिरंगा’, ‘वेलकम’ यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘परिंदा’मधील अण्णाच्या भूमिकेने त्यांच्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. दमदार संवादफेक, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला दिलेली वेगळी उंची यामुळे नाना पाटेकर यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपले अढळ स्थान निर्माण केले.

नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाच्या वृत्ताने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.