
Image Source:(Internet)
पुणे : नानांच्या अंत्यविधीसाठीची तयारी पूर्ण झाली असून, पार्थिव दाखल झाल्यानंतर अंत्यदर्शन आणि अंत्यविधीचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने अंत्यविधीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून, व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.
अंत्यविधीसाठी महत्त्वाच्या व्यक्तींची (व्हीआयपी) उपस्थिती आणि सर्वसामान्य नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठीही नियोजन करण्यात येत आहे.
अंत्यविधीसाठी नेमके किती आणि कोणते व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत, याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही. अंत्यविधी साधारणतः सायंकाळी ५ ते ५:१५ वाजेदरम्यान होण्याचा अंदाज असून, अंतिम वेळ परिस्थितीनुसार निश्चित केली जाणार आहे.
याबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी माहिती दिली.