नाना पाटेकरांच्या निधनाने मुलगा मल्हारला मोठा धक्का; फडणवीसांचा फोन, रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ समोर

    08-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

गोवा : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मल्हार यांना फोन करून सांत्वन केल्याची माहिती समोर आली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मल्हार गोव्यातील रुग्णालयात पोहोचला. यावेळी रुग्णालयाबाहेरचा त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मल्हारला दोन व्यक्ती आधार देत चालवत असल्याचे दिसत आहे. वडिलांच्या निधनाचा मोठा धक्का त्याला बसल्याचे या दृश्यातून जाणवत आहे.

पहाटे घेतला अखेरचा श्वास
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, पथक घरी पोहोचेपर्यंत नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते.

त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. सीपीआरसह वैद्यकीय उपचार करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पहाटे ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

फडणवीसांनी केला मल्हारला फोन-
नाना पाटेकर यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मुलगा मल्हार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. फडणवीस यांनी मल्हारचे सांत्वन करत या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे सांगितल्याची माहिती आहे.

दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी चाहत्यांसाठीही अत्यंत धक्कादायक ठरली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत सक्रिय असलेले नाना पाटेकर अचानक आपल्यातून निघून जातील, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.

नानांचा शेवटचा व्हिडीओ चर्चेत-
नाना पाटेकर यांचा गोव्यातील एका कार्यक्रमातील शेवटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ते माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. याचवेळी त्यांनी आयुष्याच्या अनिश्चिततेवरही भाष्य केले होते.

“माणसाचं काही खरं नाही, आज आहे तर उद्या नाही,” अशा आशयाचे विचार त्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

पार्थिव पुण्याकडे आणण्याची तयारी-
नाना पाटेकर यांचे पार्थिव सध्या गोव्यातील रुग्णालयात असल्याची माहिती आहे. त्यानंतर पार्थिव पुण्याकडे आणले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

नाना पाटेकर यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व हरपले असून, त्यांच्या कुटुंबीयांसह असंख्य चाहते आणि सहकलाकार शोकसागरात बुडाले आहेत.