इंडिगोकडून प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, इंधन शुल्कात वाढ

    06-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IndiGoने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांवरील इंधन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्याने तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना मार्गानुसार १ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो.

विमान इंधनाच्या वाढलेल्या किमतीमुळे इंडिगोने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर होणाऱ्या नवीन बुकिंगवर सुधारित इंधन शुल्क लागू होणार आहे.

गेल्या काही दिवसांत मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम जेट फ्युएलच्या किमतीवर झाला असून, विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

दरम्यान, आधीच बुक केलेल्या तिकिटांवर या नव्या शुल्काचा परिणाम होणार नाही. मात्र, ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर नवीन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना वाढीव शुल्काचा फटका बसणार आहे.