धर्मपेठेतील ‘द फ्युजन कॅफे’मध्ये छुप्या पद्धतीने हुक्का सुरू; सीताबर्डी पोलिसांचा छापा

    03-Oct-2026
Total Views |
बाहेरून कॅफे बंद, आत १३ ग्राहक हुक्का ओढताना आढळले; मालक-मॅनेजर अटकेत

The Fusion Cafe
 Image Source:(Internet)
 
नागपूर : धर्मपेठ परिसरातील ‘द फ्युजन कॅफे’(The Fusion Cafe) मध्ये बाहेरून कॅफे बंद असल्याचे भासवत आतमध्ये हुक्का सुरू असल्याचा प्रकार सीताबर्डी पोलिसांच्या कारवाईत समोर आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर कॅफेवर रात्री छापा टाकण्यात आला.
 
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कॅफेचे शटर बंद होते. मात्र, आतमध्ये ग्राहक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कॅफेमध्ये प्रवेश केला. यावेळी १३ जण हुक्का सेवन करताना आढळून आले. त्यात काही युवतींचाही समावेश होता.
 
या कारवाईनंतर पोलिसांनी कॅफेचा मालक मयंक अग्रवाल आणि मॅनेजर विक्रांत शिंदे यांना ताब्यात घेत अटक केली. कॅफेमधून हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर साहित्य असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
कॅफेच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था ठेवून आतमध्ये हुक्का सुरू असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या ठिकाणी नेमकी कोणत्या पद्धतीने ही व्यवस्था सुरू होती, याचा तपास सीताबर्डी पोलिसांकडून केला जात आहे.