सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आठवड्याच्या सुरुवातीलाच भाव घसरले, पाहा आजचे दर

    26-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : सोन्याच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या चढ-उतारांदरम्यान ग्राहकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली असून, त्याचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातही सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. आता नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दर खाली आल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि दिल्लीत सोन्याचे भाव किती?
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४२ हजार ७२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३० हजार ८४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ५७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३० हजार ६९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवण्यात आला आहे.

सोन्याच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण-
मागील आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५ हजार ८० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४ हजार ६५० रुपयांची घट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सोन्याच्या बाजारभावातील बदलांकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

चांदीचे भावही घसरले-

सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंच्या खरेदीचे नियोजन करणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, सोन्या-चांदीचे दर शहरानुसार बदलतात. त्याचबरोबर दागिन्यांच्या खरेदीवेळी जीएसटी आणि घडणावळ शुल्कही आकारले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफाकडून अद्ययावत दरांची खात्री करून घेणे आवश्यक आहे.