भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी बजावला मतदानाचा हक्क; पदवीधरांना मतदानाचे आवाहन

    23-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी पदवीधर मतदारांशी संवाद साधत लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार महत्त्वाचा असून, विदर्भाच्या विकासाचा विचार करून पदवीधरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे कोहळे म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरील विश्वासासह विदर्भातील युवकांच्या विकासाचा विचार करून मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मतदारांना विनंती करताना, “सुधाकर कोहळे यांच्या नावासमोरील रकान्यात एक रेष मारून मला आशीर्वाद द्यावा,” असे ते म्हणाले. पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.