परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात १२१ कन्यांचे पूजन; पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे यांची उपस्थिती

    19-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बीड : नवरात्रोत्सवानिमित्त परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरातील वक्रेश्वर मंदिरात १२१ कन्यांचे पूजन आणि सामूहिक महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठणाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.

यावेळी पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते १२१ कन्यांचे पूजन करण्यात आले. कन्यापूजनाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात आला. सामूहिक स्तोत्रपठणामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात देवीच्या उपासनेसह कन्यापूजनाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.