नागपूरच्या टेका नाक्यावर गोवंश तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई; १४ जनावरे ताब्यात, दोघे अटकेत

    16-Oct-2026
Total Views |
 
Cattle smuggling
 Image Source:(Internet)
 
नागपूर : गोवंशाची (Cattle) अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठी जनावरे जमा करून ठेवल्याच्या संशयावरून पाचपावली पोलिसांनी टेका नाका परिसरात दोन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत १४ गोवंशांची सुटका करण्यात आली असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या जनावरांचे एकूण मूल्य ८ लाख ७२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
 
पाचपावली पोलिसांना टेका नाका परिसरात गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. याप्रकरणी यशोधरानगर येथील मोहम्मद इब्राहिम इस्तकार अहमद अन्सारी आणि पाचपावलीतील चिराग अली चौक परिसरातील अब्दुल सादिक अब्दुल रशीद कुरेशी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
 
पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून १४ गोवंश ताब्यात घेतले. सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना देखभालीसाठी धंतोली येथील गोरक्षण केंद्रात हलविण्यात आले आहे.
 
या प्रकरणात गोवंश नेमके कोणत्या उद्देशाने जमा करण्यात आले होते, यासह अन्य बाबींचा तपास पाचपावली पोलीस करीत आहेत.