बहुचर्चित मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडात मुस्कान आणि साहिलला फाशीची शिक्षा

    14-Oct-2026
Total Views |
सौरभ राजपूत हत्या प्रकरणाने देशभरात उडाली होती खळबळ

Image Source:(Internet)

मेरठ :
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील बहुचर्चित ‘ब्लू ड्रम’ हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे. सौरभ राजपूत हत्या प्रकरणात त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा दावा समोर आला आहे.

मार्च २०२५ मध्ये सौरभ राजपूत यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले होते. पोलिसांच्या तपासानुसार, या हत्येत मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांच्यावर आरोप करण्यात आले होते. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते सिमेंटने भरलेल्या निळ्या ड्रममध्ये लपवल्याचा आरोप होता. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.

सरकारी पक्षाकडून कठोर शिक्षेची मागणी-
या प्रकरणात सरकारी पक्षाने आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, बचाव पक्षाने आरोपींच्या दोन मुलींच्या भविष्याचा विचार करून मृत्युदंड न देण्याची विनंती केल्याचे सांगितले जाते.

सौरभच्या कुटुंबीयांना न्यायाची अपेक्षा-
सौरभच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांनी पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल केले होते. आता या खटल्यातील निकाल आणि शिक्षेबाबतची अधिकृत माहिती महत्त्वाची ठरणार आहे.