पाकिस्तानात प्रवासी रेल्वे रुळावरून घसरली; ५ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

    13-Oct-2026
Total Views |
मुलतानमधील शेर शाह पुलाजवळ पहाटे अपघात; बचावकार्य सुरू

Image Source:(Internet)

पाकिस्तान :
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मंगळवारी पहाटे प्रवासी रेल्वे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कराचीहून पेशावरकडे जाणारी रहमान बाबा एक्सप्रेस पहाटे ५:१५ च्या सुमारास मुलतानमधील शेर शाह पुलाजवळ रुळावरून घसरली. या अपघातामुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रेल्वे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.