डोनाल्ड ट्रम्पचा थरारक दावा: व्हेनेझुएलाचा ५ कोटी बॅरल तेल अमेरिकेला सुपूर्द

    07-Jan-2026
Total Views |

Donald Trump
Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
अमेरिकेने व्हेनेझुएलावर (Venezuela) जोरदार कारवाई करत केवळ सैन्यहल्लाच नाही, तर थेट देशाचे अध्यक्ष मादुरो यांना अटक करून त्यांच्या पत्नीसह अमेरिकेत आणले आहे. सध्या मादुरो अमेरिकेच्या एका तुरुंगात आहेत. एका राष्ट्राध्यक्षाला कैद करण्याच्या घटनेनंतर संपूर्ण जगात मोठा धक्का बसला आहे. या घटनाक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक जोरदार घोषणा केली आहे.
 
ट्रम्प यांनी सांगितले की, व्हेनेझुएलाने अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल कच्चे तेल पुरवण्यास मान्यता दिली आहे. अनेकदा व्हेनेझुएला विरोधात अमेरिकेने अमली पदार्थ तस्करीसंदर्भात आरोप केले होते, मात्र खऱ्या कारणामागे तेल नियंत्रण ठेवण्याचा उद्देश आहे.
 
आता ट्रम्पच्या मते, व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचा पूर्ण ताबा बसेल. मादुरोला न्यायालयात उपस्थित करताना त्यांनी स्वतः सांगितले की, ते एका सार्वभौम देशाचे अध्यक्ष असून त्यांचा अपहरण करून अमेरिकेत आणले गेले आहे, ते कोणतेही गुन्हेगार नाहीत.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत म्हटले, "ऊर्जा विभागाचे सचिव ख्रिस राईट यांना या योजनेवर काम करण्यास सांगितले आहे. तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या माध्यमातून ते अमेरिकेत आणले जाईल आणि सुरक्षित साठवणूक केली जाईल."
 
ट्रम्प पुढे म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष म्हणून माझ्या हाती या तेलावर पूर्ण नियंत्रण असेल, पण त्याचा उपयोग व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या जनतेच्या हितासाठी केला जाईल." परंतु या विधानामागे ट्रम्पचा मोठा खोटेपणा उघडकीस आला आहे. मादुरोला कैद करून आणि व्हेनेझुएलाच्या तेलावर ताबा मिळवणे हेच ट्रम्पचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
इतकाच नव्हे, तर अमेरिका लवकरच व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रातील प्रमुख मालकांसोबत बैठक घेणार असून त्याची तारीख लवकरच निश्चित होणार आहे. व्हेनेझुएलाच्या तेलवर अमेरिकेचा ताबा बसल्याने, ट्रम्पच्या हाती आता या देशाचा मोठा आर्थिक आणि राजकीय नियंत्रण आले आहे.
 
या घटनांमुळे जागतिक राजकारण आणि तेल बाजारपेठेत मोठा घमासान उडाल्याचे स्पष्ट आहे.