गृह मंत्रालयाकडून मोठे प्रशासकीय फेरबदल; 31 IAS व 18 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    05-Jan-2026
Total Views |
 
Home Ministry
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Ministry) केंद्रशासित प्रदेशांतील प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करत ४९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी दिली आहे. या फेरबदलांत ३१ आयएएस आणि १८ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांची नियुक्ती विविध केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आली आहे.
 
केंद्रशासित प्रदेशांतील प्रशासकीय तसेच पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी ही थेट गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने, या बदल्यांचे आदेश मंत्रालयाने अधिकृतरीत्या जारी केले आहेत. या निर्णयाचा परिणाम दिल्लीसह जम्मू-काश्मीर, लडाख, गोवा, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमण-दीव येथील
 प्रशासकीय यंत्रणांवर होणार आहे.
 
IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या-
या फेरबदलांत वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना संवेदनशील व महत्त्वाच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख तसेच अंदमान-निकोबारसारख्या प्रदेशांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या-
पोलीस प्रशासन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या असून, अरुणाचल प्रदेश, गोवा, चंदीगड, पुद्दुचेरी आणि जम्मू-काश्मीरमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे.
 
गृह मंत्रालयाच्या मते, या प्रशासकीय फेरबदलांमुळे केंद्रशासित प्रदेशांतील प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि परिणामकारक होईल. नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.