अजित पवारांच्या निधनानंतर ठाकरे कुटुंबाने पवार कुटुंबाची घेतली भेट

    29-Jan-2026
Total Views |
 
Thackeray family
 Image Source:(Internet)
बारामती :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भीषण विमान अपघातातील निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबाने बारामती येथे पवार कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
 
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी उशिरा रात्री बारामतीत दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे उपस्थित होते. ठाकरे कुटुंबाने पवार यांच्या निवासस्थानी जाऊन सुनैत्रा पवार तसेच इतर कुटुंबीयांची भेट घेतली आणि दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या.
 
यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचे अकाली निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी असल्याची भावना व्यक्त केली. राज्याने एक कणखर, अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व गमावले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, विविध राजकीय पक्षांतील अनेक नेते बारामतीत दाखल होत असून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अजित पवार यांच्यावर आज शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार होणार आहेत.