बारामतीत विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कोण होते ? सहाही जणांचा झाला मृत्यू

    28-Jan-2026
Total Views |
 
Ajit Pawar
 Image Source:(Internet)
बारामती:
महाराष्ट्रात आज सकाळी एक दु:खद विमान अपघात घडला, ज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. अजित पवार बारामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार करत होते. मात्र विमान धावपट्टीवर उतरताना अनियंत्रित होऊन कोसळले आणि आग लागल्याने सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले.
 
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा वैयक्तिक सहाय्यक, एक पीएसओ, दोन पायलट आणि एक कर्मचारी होते. मृत्यू झालेल्यांमध्ये विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे.
 
Ajit Pawar 
या दुर्घटनेने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठा शोककळा पसरली असून, विविध पक्षांनी दुःख व्यक्त केले आहे. बारामतीसह राज्यभरात शोकसभांचे आयोजन केले जात आहे.