Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील ग्रामीण राजकारणाला चालना देणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा (Elections) कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत निवडणूक वेळापत्रक जाहीर केले. यामुळे पुण्यासह राज्यातील १२ जिल्ह्यांत पुन्हा एकदा निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण लागू आहे, त्या ठिकाणीच या टप्प्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकांमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता असून स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे.