मद्यप्रेमींना धक्का! महाराष्ट्रात सलग चार दिवस दारूविक्री बंद; ड्राय डे जाहीर

    10-Jan-2026
Total Views |
 
Dry Day declared
Image Source:(Internet) 
नागपूर :
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून सभा, रॅली आणि रोड शोची गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ड्राय डे (Dry Day) संदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
 
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी संबंधित 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मद्यविक्रीवर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत दारूची दुकानं, बार आणि परमिट रूम पूर्णतः बंद राहणार असून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास सक्त मनाई असेल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार मंगळवार, 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. याच वेळेपासून ड्राय डे लागू होणार असून मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. परिणामी 13 ते 16 जानेवारीदरम्यान सलग चार दिवस मद्यविक्री ठप्प राहणार आहे.
 
ड्राय डेचे अधिकृत वेळापत्रक
13 जानेवारी 2026 – सायंकाळी 6 नंतर
14 जानेवारी 2026 – पूर्ण दिवस
15 जानेवारी 2026 – मतदानाचा दिवस
16 जानेवारी 2026 – मतमोजणीचा दिवस (निकाल जाहीर होईपर्यंत)
 
या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.