श्रेयस अय्यर टीम इंडियाबाहेर; तरीही आनंदात, कारण स्वतःच सांगितलं

    08-Sep-2025
Total Views |
 
Shreyas Iyer
 (Image Source-Internet)
 
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या टीम इंडियाच्या मुख्य संघाबाहेर असून त्याच्या कमबॅकची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी हे काळजीचं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघात स्थान मिळालं नाही, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतही त्याचा विचार झालेला नाही, तसेच आशिया कप स्पर्धेतही त्याला संघात समाविष्ट करण्यात आले नाही. यावरून असे दिसते की सध्या त्याचा लक्ष वनडे आणि टी20 सामन्यांवर केंद्रित आहे.
टीमबाहेर असतानाही सकारात्मक दृष्टिकोन-
श्रेयस अय्यरने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं, “जेव्हा तुम्ही संघात असाल आणि खेळण्यास पात्र असाल तरी बाहेर राहिल्यास दु:ख होतं. पण जर तुम्हाला माहित असेल की इतर खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत आणि टीमसाठी योगदान देत आहेत, तर त्यांना पाठिंबा देणं आवश्यक आहे. शेवटचा उद्देश टीम इंडियाला यश मिळवून देण्याचा असतो. जेव्हा टीम जिंकते, तेव्हा सर्व खूश असतात.”
यातून स्पष्ट होतं की टी20 संघातील खेळाडू चांगले प्रदर्शन करत आहेत आणि श्रेयस अय्यर त्याच्या संघावर खूश आहे.
चाहत्यांसाठी गुड न्यूज-
श्रेयस अय्यरच्या चाहत्यांसाठी या महिन्यातच चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. इंडिया ए संघाचा ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध सामना होणार असून त्याचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. या कामगिरीवरून त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मुख्य संघात निवड होण्याची शक्यता वाढली आहे. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध पहिला सामना 16 सप्टेंबरपासून आणि दुसरा 23 सप्टेंबरपासून होणार आहे.