दिवाळीत एसटी प्रवास महागणार; 10 टक्के तिकीटवाढ लागू!

    30-Sep-2025
Total Views |
 
Ticket hike
 Image Source:(Internet)
मुंबई :
दिवाळीचा उत्साह आता चाकरमान्यांच्या प्रवासातून ओसंडून वाहणार आहे. पण या आनंदसोबतच त्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने यंदाच्या सणासुदीच्या हंगामात तिकीट दरवाढीचा (Ticket hike) निर्णय घेतला आहे.
 
15 ऑक्टोबरपासून ते 5 नोव्हेंबरपर्यंत सर्वसामान्य एसटी प्रवास 10 टक्क्यांनी महाग होणार आहे. मात्र, शिवनेरी आणि शिवाई या आलिशान बसगाड्यांना या वाढीपासून सूट देण्यात आली आहे.
 
एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणी, पगाराचे ओझे आणि प्रवाशांच्या मोठ्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी, नेहमीच परवडणाऱ्या दरात मिळणारा एसटी प्रवास आता थोडा महागणार आहे.