मराठा समाजाला मोठा दिलासा; गॅझेटिअरमुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

    03-Sep-2025
Total Views |
 
Maratha community
 (Image Source-Internet)
मुंबई :
मराठा (Maratha) समाजासाठी मोठी आनंदवार्ता! मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठवाड्यातील हजारो मराठा कुटुंबांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला झाला असून, त्यांना थेट ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ज्या मराठ्यांच्या नोंदी गॅझेटमध्ये असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिले जाईल. यामुळे बहुसंख्य मराठा समाजाला शिक्षण, नोकरी आणि इतर क्षेत्रांत आरक्षणाचे फायदे मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
 
प्रक्रिया गावपातळीवरच-
ग्रामपातळीवर समित्या स्थापन करून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. शेतजमिनीचा पुरावा किंवा १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे वास्तव्य दाखवणारे कागद असतील तर कुणबी प्रमाणपत्र तातडीने दिले जाईल. याशिवाय, एका व्यक्तीला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनाही त्याचा फायदा होऊ शकतो.
 
सरसकट आरक्षणावर निर्णय बाकी-
सरकारने अनेक मागण्या मान्य केल्या असल्या तरी संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यासाठी दोन महिन्यांचा अभ्यास कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
 
म्हणजेच, सरसकट आरक्षणाबाबत संभ्रम असला तरी मराठा समाजातील मोठ्या वर्गासाठी ओबीसी आरक्षणाचे दार उघडले आहे.