Image Source:(Internet)
मुंबई:
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरांत ओळख झालेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) यांची कार नुकतीच गंभीर अपघातात अडकली आहे.
माहिती नुसार, रुपाली भोसले अपघातात संपूर्ण सुरक्षित आहे, पण त्यांच्या लक्झरी मर्सिडिझ बेंझ कारला मोठे नुकसान झाले आहे. ही गाडी रुपालीने काही महिन्यांपूर्वी खरेदी केली होती आणि आता अपघातामुळे त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
रुपालीने स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा अपघात दर्शवणारा व्हिडीओ शेअर केला असून, त्याच्यासोबत त्यांनी लिहिले – “Accident झाला, वाईट दिवस” आणि ब्रोकन हार्ट इमोजीदेखील वापरले.
व्हिडीओमध्ये दिसते की, गाडीच्या बोनेटवर मोठा डेन्ट असून समोरच्या बाजूला देखील जास्त नुकसान झाले आहे. तरीही, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहतात. सध्या त्या स्टार प्रवाहवरील ‘लंपडाव’ मालिकेत ‘सरकार’ या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत चेतन वडनेरे आणि कृतिका देव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.