Image Source:(Internet)
वर्धा :
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिखबेळा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये उपनिरीक्षक सतीश दुधान, गोपाल शिंदे आणि सहाय्यक पोलीस शिपाई संजय पंचभाई यांचा समावेश आहे. जुगार खेळ सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाड टाकली. मात्र अचानक आरोपींनी तलवारीसह पोलिसांवर धावून जात हल्ला केला.
या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांवर थेट शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही घटना गृहराज्यमंत्री यांच्या जिल्ह्यात घडल्याने पोलीस दलातही प्रचंड संताप व्यक्त होत असून सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.