Image Source:(Internet)
लेह :
लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रख्यात सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच (25 सप्टेंबर) वांगचुक यांच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख या संस्थेची एफसीआरए परवाना नोंदणी केंद्र सरकारने रद्द केली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
वांगचुक यांच्या आंदोलनामुळे स्थानिक तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. आंदोलक आणि पोलिस यांच्यातील तणाव वाढत गेला आणि अखेर परिस्थिती हिंसक वळणावर गेली. या संघर्षात चार तरुणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी वांगचुक यांच्यावर टाकत केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे लडाखमध्ये वातावरण तणावपूर्ण असून नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.