Image Source:(Internet)
आधार (Aadhaar) कार्ड हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. शाळेत प्रवेश, बँक खाते उघडणे, मोबाईल सिम घेताना किंवा सरकारी योजना लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे. केवायसी (KYC) पासून ते विविध सरकारी सेवांपर्यंत आधार कार्ड अनिवार्य असल्यामुळे त्याचे अपडेटेड असणे खूप गरजेचे आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने मुलांच्या आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेटसाठी एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लहान मुलांच्या आधार अपडेटसाठी ५० रुपये शुल्क आकारले जात होते, परंतु आता पालकांना हा खर्च करावा लागणार नाही.
केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे. यामुळे लाखो कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी होईल आणि मुलांच्या आधार नोंदणी प्रक्रियेत गती येईल.
सरकारने मुलांच्या आधार बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य केले आहे, ज्यामुळे भविष्यातील शैक्षणिक, आर्थिक आणि सरकारी सेवांमध्ये मुलांना अडथळा येणार नाही. ‘लाडकी बहीण’ यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट असणे अनिवार्य असल्याने पालकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.