"महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न"; मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या विटंबनेवर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

    17-Sep-2025
Total Views |
 
Meenatai Thackeray statue
 (Image Source-Internet)
मुंबई :
दादरमधील शिवाजी पार्क परिसरात उभारलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केली आहे. पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गुन्हा नोंदवला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
 
या घटनेनंतर राज ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनीही पुतळ्याची पाहणी करून संताप व्यक्त केला. त्यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर शंका उपस्थित केली की, *“ही केवळ विटंबना नसून महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असू शकतो.”
 
उद्धव ठाकरे म्हणाले, *“अशा कृत्याला शब्दांत निंदा करणंही कमीच आहे. ज्याला स्वतःच्या आई-वडिलांचा सन्मान नाही, अशा अधम प्रवृत्तीच्या व्यक्तीने ही घृणास्पद कृती केली असावी. किंवा बिहारमध्ये जसा मोदींच्या आईबाबत अपमान झाल्यानंतर राज्यात बंद घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता, तसा महाराष्ट्रातही अस्वस्थता निर्माण करण्याचा कट रचला जातोय.”
 
शिवसैनिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी संयम पाळण्याचं आवाहन केलं. पोलिस आरोपीपर्यंत पोहोचतील, याबाबत आम्ही आश्वस्त आहोत,असंही त्यांनी स्पष्ट केलं.