दिवाळीपूर्वी पीएम-किसान योजनेचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात?

    17-Sep-2025
Total Views |
 
PM KISAN scheme
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली:
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि आर्थिक सहाय्य देणे हे उद्देश ठेऊन केंद्र सरकार अनेक योजनांची अंमलबजावणी करत आहे. अशाच योजनांपैकी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 ची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये (दर चार महिन्यांनी 2,000) त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केली जाते.
 
२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत २० हप्ते जारी केले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्ट रोजी वाराणसी संसदीय मतदारसंघातून २० वा हप्ता जारी केला होता. आता शेतकऱ्यांना २१ वा हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार दिवाळीपूर्वी २१ वा हप्ता जारी करू शकते, मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही.
 
२१ व्या हप्त्याचे निकष-
१ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी किंवा ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य आहेत (पती/पत्नी, पालक, १८ वर्षांवरील मुलं/मुली) त्यांना भौतिक पडताळणी पूर्ण होईपर्यंत हप्ते मिळणार नाहीत.
 
ज्या कुटुंबांचे सदस्य आधीच या योजनेचा लाभ घेत आहेत, ते पात्र असतील.
 
ई-केवायसी पडताळणी अद्याप पूर्ण न केलेल्यांना आणि जमिनीची पडताळणी न झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.
कुटुंबातील कोणताही सदस्य डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट किंवा केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी, संवैधानिक पदाधिकारी किंवा माजी/सध्याचे मंत्री असल्यास लाभ मिळणार नाही.
 
शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की ई-केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करा आणि जमिनीची पडताळणी पूर्ण असल्याची खात्री करा, जेणेकरून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत खात्यात मिळवता येईल.