(Image Source-Internet)
मुंबई :
आगामी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा संघर्ष तापू लागला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआय (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी थेट 24 जागांची मागणी पुढे केली असून उपमहापौरपदही आमच्याच वाट्याला यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
उत्तर मुंबई जिल्हा आरपीआय कामगार परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना आठवले म्हणाले, “महायुतीत आम्हाला किमान 24 जागा मिळाव्यात, त्यापैकी उत्तर मुंबईतील सात जागा आमच्यासाठी अत्यावश्यक आहेत. या जागा दिल्यास आरपीआय निश्चित विजय मिळवून दाखवेल. सत्ता स्थापनेनंतर उपमहापौरपद आमच्याकडे यायलाच हवे.”
दरम्यान, त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. “काँग्रेसने नेहमीच समाजात फूट पाडून सत्ता गाजवली. आजही संविधान बदलले जाणार असल्याचा खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान अभेद्य आहे, ते कोणीही बदलू शकत नाही,” असे आठवले म्हणाले.
त्यांच्या मते, आरपीआयला महायुतीत योग्य सन्मान मिळाल्यास युती अधिक मजबूत होईल आणि मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा विजय निश्चित होईल.