(Image Source:Internet)
छत्रपती संभाजीनगर :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे.
महाजन यांच्या राजीनाम्यामुळे छत्रपती संभाजीनगरात मनसेच्या संघटनात्मक घडामोडींवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत होते. याआधी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांची अमित ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली होती. नाराजी दूर करण्याचे प्रयत्न झाले, मात्र ‘आता कुठेतरी मर्यादा आखायला हव्यात,’ असे म्हणत अखेर महाजन यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
या घडामोडींमुळे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नवा धक्का बसला असून, पुढील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते.