(Image Source:Internet)
मुंबई :
राज्य शासनाने जुलै २०२५ मध्ये देशी आणि विदेशी दारूचे दर वाढवल्यानंतर त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत जाणवू लागला आहे. वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील विक्रीत देशी व विदेशी दारूची मागणी कमी झाली असून बिअरची (Beer) विक्री उलट वाढली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विदेशी दारूच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे, तर देशी दारूचेही खप कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसते. मात्र, परवडणारा पर्याय असल्याने बिअरची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ग्राहकांचा कल आता महागड्या दारूपेक्षा बिअरकडे झुकत असल्याचे स्पष्ट होत असून, तज्ज्ञांचा अंदाज आहे की दरवाढ कायम राहिल्यास पुढील महिन्यांत देशी-विदेशी दारूचा बाजार आणखी आकुंचन पावेल आणि बिअरची मागणी वाढत राहील.