(Image Source:Internet)
सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger) हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय गुप्तचर संग्रहालयात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट बनला आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी सोशल मीडियावर हे आनंददायी वृत्त शेअर करत टायगरची गाथा कायमची असल्याचे सांगितले.
कबीर खान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, “चित्रपट फक्त बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे महत्त्वाचे नाही, तर तो प्रेक्षकांच्या मनात किती काळ जिवंत राहतो हे खरोखर महत्वाचे आहे. या दृष्टीने ‘एक था टायगर’ नेहमीच हिट राहणार आहे.” त्यांनी २०१२ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर झालेल्या यशाबद्दल आणि २०२५ मध्येही त्याबद्दल प्रेमाने चर्चा होण्याबद्दल आनंद व्यक्त केला.
‘एक था टायगर’ आता वॉशिंग्टन डीसी येथील आंतरराष्ट्रीय गुप्तचर संग्रहालयात ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘स्पाय गेम’, ‘में इन ब्लॅक’ आणि ‘टिंकर टेलर सोल्जर स्पाय’सारख्या हॉलिवूड स्पाय चित्रपटांसोबत प्रदर्शित होणार आहे. भारतासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. चित्रपटाच्या यशानंतर सलमान-कतरिनाला घेऊन ‘टायगर जिंदा है’ आणि ‘टायगर 3’ देखील बनवण्यात आले आहेत.