महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य निवडणुका: 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर

    12-Sep-2025
Total Views |
   ZP(Image Source-Internet)
मुंबई:
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग लागला आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषद (Zilla Parishad) अध्यक्षपदांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. ग्रामविकास विभागाकडून याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट (IIIDEM) येथे पार पडली.
 
या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचे आरक्षण निश्चित करण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची ही यादी खालीलप्रमाणे आहे:
 
जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी आरक्षण:
पालघर – अनुसूचित जमाती
रायगड – सर्वसाधारण
रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक – सर्वसाधारण
धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदुरबार – अनुसूचित जमाती
जळगाव – सर्वसाधारण
अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)
पुणे – सर्वसाधारण
सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली – अनुसूचित जात
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धरणाशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा – सर्वसाधारण
यवतमाळ – सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा – अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)
 
या आरक्षणानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया अधिक सुसंगत होईल आणि स्थानिक स्तरावर नेतृत्वाची संधी विविध समाजघटकांना मिळेल.