(Image Source-Internet)
भावाबहिणीच्या स्नेह, आपुलकी आणि संरक्षणाच्या वचनाचा पवित्र उत्सव रक्षाबंधन (Raksha Bandhan) आज देशभर साजरा होत आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करते.
यंदाचा खास मुहूर्त-
श्रावण पौर्णिमेची तिथी ८ ऑगस्ट दुपारी २:१२ वाजता सुरू होऊन ९ ऑगस्ट दुपारी १:२४ वाजता संपणार आहे. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ५:४७ पासून दुपारी १:२४ पर्यंतचा ७ तास ३७ मिनिटांचा कालखंड राखी बांधण्यासाठी अत्यंत शुभ मानला जात आहे. यावेळी भद्राकाल नसल्याने बहिणींना मुहूर्ताची चिंता न करता विधी करता येणार आहे.
कोणता वेळ टाळावा?
रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी ९:०७ ते १०:४७ हा राहू काळ असून, या काळात राखी बांधणे टाळण्याचा सल्ला पंडितांकडून दिला जातो.
सर्वार्थ सिद्धी योगाचा लाभ-
यावर्षी सणाच्या दिवशी पहाटे ५:४७ ते दुपारी २:२३ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असल्याने, या वेळेत राखी बांधल्यास नाते अधिक दृढ होईल आणि आयुष्यात सौख्य वाढेल, अशी श्रद्धा आहे.
भावाबहिणीच्या नात्यातील जिव्हाळा आणि संरक्षणाची भावना साजरी करण्यासाठी यंदाचा रक्षाबंधन दिवस शुभ आणि मंगलकारी ठरणार आहे.