अनाथ बालकांसाठी घरचाच आधार; सरकारची नवी योजना कार्यान्वित

    06-Aug-2025
Total Views |
 
orphans
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यातील अनाथ, निराधार आणि बेघर मुलांसाठी सरकारने एक संवेदनशील निर्णय घेतला आहे. संस्थांमध्ये राहण्याऐवजी या मुलांना आता आपुलकीचा आणि सुरक्षित कौटुंबिक आधार मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना' सुरू करून या बालकांना प्रेमळ वात्सल्य लाभावं, यासाठी नवा मार्ग स्वीकारला आहे.
 
या उपक्रमांतर्गत अनाथ मुलांना संगोपनासाठी निवडलेल्या कुटुंबांमध्ये ठेवण्यात येणार असून, त्यांना शिक्षण, आरोग्य सुविधा आणि भावनिक आधार दिला जाईल. महिल व बालविकास विभागाच्या माध्यमातून या मुलांच्या संगोपनासाठी दरमहा निश्चित रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.
 
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेला हिरवा कंदील दिला असून, शासनाने त्यासाठी मोठा निधीही मंजूर केला आहे. संस्थात्मक संगोपनाच्या मर्यादा लक्षात घेऊन मुलांना कुटुंबसंस्थेच्या वात्सल्यसंपन्न छायेखाली वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. अशा पद्धतीने वाढलेल्या मुलांचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.