हिंदू सणांमध्ये खोडा नको;मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

    27-Aug-2025
Total Views |
 
Navneet Rana slams Manoj Jarange Patil
 (Image Source-Internet)
अमरावती :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावरून माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी स्पष्ट केले की, "हिंदू सणांमध्ये अडथळा आणू नये आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे."
 
नवनीत राणा म्हणाल्या, "न्यायालयावर सगळ्यांचा विश्वास आहे. जे काही निर्णय न्यायालय देईल, तो सगळ्यांनी मान्य करायला हवा. गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भक्त मुंबईत येतात. त्यामुळे या अकरा दिवसांत कोणतेही आंदोलन करून वातावरण बिघडवू नये."
 
त्या पुढे म्हणाल्या, "जरांगे यांनी आपली मागणी अकरा दिवसांनीही मांडता येईल. पण सणाचा आनंद आणि उत्साह कुणीही खराब करू नये. हिंदुत्वाचा खरा समर्थक कोण, हे ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही."