(Image Source-Internet)
मुंबई:
आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मालेगावमध्ये मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यावर भर देण्यात आला आहे.
याआधी बेस्ट पतपेढी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी युती केली होती, पण त्यांना 21 जागांपैकी एकही जिंकता आली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकत्र येतील का, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि गणेशोत्सवाचे निमंत्रणही पाठवले आहे.