बिग बॉस 19 ची धमाकेदार सुरुवात; मराठी कॉमेडियन प्रणित मोरेसह 16 जण घरात

    25-Aug-2025
Total Views |
 
Bigg Boss 19
 (Image Source-Internet)
 
लाखो चाहत्यांच्या प्रतिक्षेनंतर बिग बॉस 19 (Bigg Boss 19) चा ग्रँड प्रीमियर रंगला. सलमान खानने या पर्वातील सर्व 16 स्पर्धकांची झलक प्रेक्षकांसमोर आणताच वातावरण उत्साही झालं. नवे नियम आणि वेगळ्या ट्विस्टसह या सीझनमध्ये हशा, वाद, प्रेमकथा आणि कटकारस्थानांचा खेळ रंगणार आहे.

घरात दाखल झालेले स्पर्धक :
अशनूर कौर (टीव्ही अभिनेत्री), झीशान कादरी (‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम), तान्या मित्तल (सोशल मीडिया इन्फ्लुएंसर), आवेज दरबार (गौहर खानचा दीर), नगमा मिराजकर (7 मिलियन फॉलोअर्स), नेहल चुडासमा (ब्युटी क्वीन), बशीर अली (स्प्लिट्सव्हिला विजेता), अभिषेक बजाज (चित्रपट अभिनेता), गौरव खन्ना (टीव्ही स्टार), नतालिया (बॉलिवूड अभिनेत्री), प्रणित मोरे (मराठी स्टँडअप कॉमेडियन), फरहाना भट्ट (कार्यकर्ती व अभिनेत्री), नीलम गिरी (भोजपुरी अभिनेत्री), कुन्निका सदानंद (अभिनेत्री व वकील), मृदुल तिवारी (जनतेच्या मतांवर निवडलेला), अमाल मलिक (संगीतकार).
 
मराठी प्रेक्षकांसाठी आकर्षण -
या सीझनमध्ये मराठी टच आणणारा स्पर्धक म्हणजे प्रणित मोरे. आपल्या विनोदी अंदाजाने त्याने एन्ट्रीपासूनच रंगत वाढवली. त्याचप्रमाणे भोजपुरी स्टार नीलम गिरीने जबरदस्त नृत्य सादर करून प्रीमियर शो गाजवला.
बिग बॉस 19 मध्ये या 16 जणांची कहाणी, संघर्ष आणि मजा पुढील काही महिन्यांत प्रेक्षकांना मनोरंजनाचा जबरदस्त डोस देणार आहे.