‘गोपी बहू’ फेम अभिनेत्री जिया मानेक लग्नबंधनात, 'या' प्राचीन योगपद्धतीतून विवाह!

    21-Aug-2025
Total Views |
 
Jiya Manek
 (Image Source-Internet)
मुंबई :
मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जिया मानेक (Jiya Manek) हिने अखेर लग्नगाठ बांधली आहे. ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील ‘गोपी बहू’ म्हणून घराघरात पोहोचलेली जिया मानेक वयाच्या ३९ व्या वर्षी तिच्या बॉयफ्रेंड वरुण जैनसोबत विवाहबंधनात अडकली.
 
जियाने तिच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना ही आनंदवार्ता दिली. फोटोसोबत तिने लिहिले – “आम्ही आता कायमचे एकत्र आलो आहोत आणि अधिकृतपणे मिस्टर अँड मिसेस झालो आहोत.”
 
विशेष म्हणजे या दोघांचा विवाह पारंपरिक ‘भूत शुद्धी विवाह’ पद्धतीनुसार पार पडला. या प्राचीन योग पद्धतीत शरीरातील पाच तत्त्वांचे शुद्धीकरण करून लग्नाची विधी केली जाते.
 
लग्नावेळी जियाने सोनेरी रंगाची साडी, पारंपरिक दागिने आणि लाल बांगड्या परिधान केल्या होत्या. तिच्या या लूकमुळे ती अधिकच खुलून दिसत होती. वरुण आणि जियाच्या लग्नाची बातमी समजताच चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
 
जियाने याआधी ‘तेरा मेरा साथ’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करत लोकप्रियता मिळवली. मात्र वैयक्तिक आयुष्याबाबत ती नेहमीच खाजगी राहिली. त्यामुळे तिच्या लग्नाची बातमी चाहत्यांसाठी मोठा सरप्राईज ठरली.