नागपुरातील हुडकेश्वर परिसरात देहविक्री रॅकेटचा भंडाफोड; आई–मुलाला अटक

    20-Aug-2025
Total Views |
- छत्तीसगडच्या तरुणीची सुटका
Prostitution racket busted
 (Image Source-Internet)
नागपूर :
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हुडकेश्वर (Hudkeshwar) पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत देहविक्रीचा गोरखधंदा उघडकीस आणला. छाप्यामध्ये आई–मुलाला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात एक २७ वर्षीय तरुणीला वाचवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता विकास कांबळे (४६) व तिचा मुलगा यश विकास कांबळे (२६) हे दोघे गेल्या सहा महिन्यांपासून हुडकेश्वर लेआउटमधील संत ताजेश्वर नगरात एका फ्लॅटमध्ये राहत होते. आरटीओ दलालीच्या कामाचे निमित्त सांगून तेथूनच त्यांनी देहविक्रीचे जाळे उभे केले होते.
क्राइम ब्रांचला याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. ऑनलाईन केवळ १,००० रुपयांत सौदा ठरल्यानंतर कारवाई करण्यात आली आणि आरोपी आई–मुलगा रंगेहात पकडले गेले.
तपासात असे समोर आले की आरोपी ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर मुलींचे फोटो पाठवत आणि फक्त ‘प्रीमियम’ ग्राहकांसाठी व्यवहार करत. कारवाईत छत्तीसगडमधून पैशाच्या लालचाने आणलेल्या तरुणीला देखील मुक्त करण्यात आले.
सध्या पोलिसांनी पीटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.