राज्यात पावसाचा जोर; 16 जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    18-Aug-2025
Total Views |
 
Heavy rains
 (Image Source-Internet)
नागपूर:
राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy rains) जनजीवन विस्कळीत केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
 
यावेळी, अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या संकटासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
राज्यातील हवामान खात्याचे अंदाजानुसार पुढील २४-४८ तासात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी वाहतूक व इमारतींमध्ये विशेष खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.