रायगडमध्ये तटकरेच पुढे; भरत गोगावलेंच्या अपेक्षांना पुन्हा धक्का

    14-Aug-2025
Total Views |
 
Aditi Tatkare
 (Image Source-Internet)
रायगड:
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादात शिवसेना (शिंदे गट) नेते भरत गोगावले (Bharat Gogavale) यांना पुन्हा एकदा निराशा पत्करावी लागली आहे. गोगावले हे या पदासाठी सर्वात पुढे असतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना असतानाही, स्वातंत्र्य:दिनी रायगडमध्ये महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची घोषणा झाली आहे. यामुळे गोगावले यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला आहे.
 
गेल्या काही दिवसांत गोगावले यांनी अनेकदा रायगडच्या पालकमंत्रिपदावर आपला हक्क असल्याचे सांगितले होते. मात्र, अधिकृत यादी जाहीर होताच त्यांच्या या दाव्यांना फाटा बसला आहे. तटकरे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात शिंदे गटाची राजकीय पकड कमी होण्याची चर्चा रंगत आहे.
 
सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाच्या यादीत गोगावलेंचे नाव कुठल्याही जिल्ह्यासाठी नसणे ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे. पालकमंत्रीपदासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि मिळालेली आश्वासने निष्फळ ठरल्याचे मानले जात आहे.
 
या यादीत इतर मंत्र्यांचाही समावेश आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन, बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोंदियात छगन भुजबळ, अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील आणि नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर पुण्यातील मुख्य सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडेल.