जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ल्यात घुसखोरी अपयशी; उरी सेक्टरमध्ये चकमकीत एक जवान शहीद

    13-Aug-2025
Total Views |
 
Infiltration attempt
 (Image Source-Internet)
 
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क असतानाच, जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. चिरुंडा गावाजवळ घडलेल्या या प्रकाराला सुरक्षा दलांनी तात्काळ प्रत्युत्तर देत हाणून पाडले.
कारवाईदरम्यान झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. सध्या परिसरात सैन्याची शोधमोहीम सुरू असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण भागाला वेढा घालण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात ही दुसरी मोठी घटना असून, याआधीही जम्मू-काश्मीरमधील काही भागांत अशाच चकमकी घडल्या आहेत. बारामुल्ला आणि उरीसारख्या संवेदनशील भागात सुरक्षा दलांनी गस्त आणि नाकाबंदी अधिक कडक केली आहे.