(Image Source : Internet)
मुंबई :
मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. गुरुवार, ८ मेपासून बेस्ट बसने (BEST bus) प्रवास करणं आता दुप्पटीने महागणार आहे. बेस्टच्या तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिकेने हिरवा कंदील दिला असून, ही दरवाढ लगेचच अंमलात येणार आहे.
बेस्ट प्रशासनाच्या माहितीनुसार, नवीन दरानुसार, ५ किमी अंतरासाठीचे साधे तिकीट ५ रुपयांवरून थेट १० रुपये करण्यात आले आहे. याशिवाय एसी बसचं किमान भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये इतकं होणार आहे. दरवाढ प्रत्येक ५ किमी अंतरासाठी लागू होणार असून, प्रवाशांना आता त्यांच्या खिशाला चांगलाच ताण बसणार आहे.
नवीन तिकीट दर (साध्या बससाठी):
५ किमी – १०
१० किमी – १५
१५ किमी – २०
२० किमी – ३०
एसी बससाठी नवे दर-
५ किमी – १२
१० किमी – २०
१५ किमी – ३०
२० किमी – ३५
मासिक पासचेही दर वाढले-
साध्या बससाठी:
५ किमी – ८०० (पूर्वी ४५०)
१० किमी – १२५०
१५ किमी – १७००
२० किमी – २६००
एसी बससाठी:
५ किमी – ११००
१० किमी – १७००
१५ किमी – २३००
२० किमी – ३५००
भाडेवाढीचं कारण काय?
२०१९ मध्ये तात्कालिक आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टच्या भाड्यात कपात केली होती. मात्र, बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात गेल्यानं ही वाढ अनिवार्य ठरल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.