भारतीयांना व्हिसाशिवाय 'या' ५८ देशांमध्ये करता येणार प्रवेश; तुमचं आवडतं पर्यटनस्थळ यादीत आहे का?

    06-May-2025
Total Views |

without visa
(Image Source : Internet) 
 
परदेश प्रवासाचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. व्हिसासाठी (Visa) लागणाऱ्या वेळखाऊ प्रक्रियेपासून मुक्तता मिळवून थेट परदेश प्रवास करण्याची संधी भारतीय नागरिकांना ५८ देशांमध्ये मिळू शकते. 'हेनले पासपोर्ट इंडेक्स'ने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीनुसार, भारताचं पासपोर्ट स्थान ८० वरून ८१व्या क्रमांकावर पोहोचलं आहे, आणि त्यानुसार आता भारतीयांना काही देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा आगमनाच्या वेळीच व्हिसा मिळवून प्रवेश करता येतो.
 
ही सोय कशावर आधारित असते?
दरवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांच्या पासपोर्टचे मूल्यांकन केले जाते. त्या देशाचा पासपोर्ट किती देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश देतो, यावर त्याचं स्थान ठरतं. भारताच्या पासपोर्टवर आता ५८ देशांत व्हिसा लागत नाही किंवा आगमनावर मिळतो. ही यादी बदलत असते, आणि सध्या भारतासाठी उपलब्ध देशांची संख्याही त्या प्रमाणे अद्ययावत झाली आहे.
 
पर्यटनासाठी उपयुक्त देशांचा समावेश
या यादीमध्ये यूके, युरोपियन युनियन किंवा अमेरिका यांसारखे प्रमुख देश नाहीत, पण दक्षिण आशिया, आफ्रिका, पॅसिफिक बेटं आणि इतर अनेक ठिकाणी असलेले सुंदर पर्यटन स्थळं मात्र यात आहेत. मॉरिशस, इंडोनेशिया, फिजी, मलेशिया आणि थायलंड यांसारखे पर्यटकप्रिय देश यामध्ये आहेत.
 
भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश असलेले देश पुढीलप्रमाणे आहेत:
१. अंगोला
२. बार्बाडोस
३. भूतान
४. बोलिव्हिया
५. ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स
६. बुरुंडी
७. कंबोडिया
८. केप वर्दे
९. कोमोरोस
१०. कूक आयलंड्स
११. जिबूती
१२. डोमिनिका
१३. इथिओपिया
१४. फिजी
१५. ग्रेनेडा
१६. गिनी-बिसाऊ
१७. हैती
१८. इंडोनेशिया
१९. इराण
२०. जमैका
२१. जॉर्डन
२२. कझाकिस्तान
२३. केनिया
२४. किरीबाती
२५. लाओस
२६. मकाओ
२७. मादागास्कर
२८. मलेशिया
२९. मालदीव
३०. मार्शल आयलंड्स
३१. मॉरिशस
३२. मायक्रोनेशिया
३३. मंगोलिया
३४. मॉन्टसेराट
३५. मोझांबिक
३६. म्यानमार
३७. नामिबिया
३८. नेपाळ
३९. निऊ
४०. पलाऊ
४१. कतार
४२. रवांडा
४३. समोआ
४४. सेनेगल
४५. सेशेल्स
४६. सिएरा लिओन
४७. सोमालिया
४८. श्रीलंका
४९. सेंट किट्स आणि नेव्हिस
५०. सेंट लुसिया
५१. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाईन्स
५२. टांझानिया
५३. थायलंड
५४. तिमोर लेस्ते
५५. त्रिनिदाद आणि टोबॅगो
५६. तुवालू
५७. वनाऊतू
५८. झिम्बाब्वे