(Image Source : Internet)
इस्लामाबाद :
शनिवारी पहाटे भारताकडून पाकिस्तानातील हवाई दलाच्या तळांवर हल्ले सुरु असतानाच पाकिस्तानात भूकंपाचे (Earthquake) तीव्र झटके जाणवले. यामुळे तणावाखाली असलेल्या नागरिकांमध्ये आणखी घबराट निर्माण झाली.
भारतीय लढाऊ विमानांनी रात्री १.४५ च्या सुमारास पाकिस्तानातील काही ठिकाणी आकाशातून क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ले चढवले. त्याच वेळेस, म्हणजेच रात्री १.४४ वाजता, पाकिस्तानात ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या दुहेरी धक्क्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून अनेकांनी घराबाहेर धाव घेतली.
भूकंपाचा केंद्रबिंदू इस्लामाबादपासून काही अंतरावर असल्याची माहिती पाकिस्तानच्या भूकंप मापन केंद्राकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवाई हल्ल्यांबाबत पाकिस्तान सरकारकडून अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही.
या घटनेने संपूर्ण पाकिस्तान हादरून गेले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.