(Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने आपल्या सत्ताकाळातील पहिल्या १०० दिवसांची कामगिरी मांडणारा अहवाल जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ४८ विभागांच्या कामगिरीचे गुण आणि टॉप मंत्रालयांची यादी सार्वजनिक केली असून, यामुळे राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेतील परिणामकारकतेवर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
या रिपोर्टनुसार, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषी, ग्रामविकास आणि परिवहन व बंदरे हे विभाग कामगिरीच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहेत. यामध्ये विभागांनी प्राप्त केलेल्या टक्केवारीच्या आधारे क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे.
कामगिरीत आघाडी घेतलेले पाच प्रमुख विभाग आणि संबंधित मंत्री:
महिला व बालविकास विभाग – ८०% | मंत्री: आदिती तटकरे
सार्वजनिक बांधकाम विभाग – ७७.९५%
कृषी विभाग – ६६.१५% | मंत्री: माणिकराव कोकाटे
ग्रामविकास विभाग – ६३.८५%
परिवहन व बंदरे विभाग – ६१.२८%
मुख्यमंत्र्यांच्या मते, ४८ विभागांपैकी तब्बल १२ विभागांनी १००% उद्दिष्टपूर्ती केली आहे, तर १८ विभागांनी ८०% पेक्षा अधिक प्रगती दर्शवली आहे.
अधिका-स्तरावर उल्लेखनीय ठरलेले अधिकारी व त्यांचे गुणांकन:
महापालिका आयुक्त:
उल्हासनगर – ८६.२९%
पिंपरी-चिंचवड – ८५.७१%
पनवेल व नवी मुंबई – ७९.४३%
पोलीस आयुक्त:
मीरा भाईंदर – ८४.५७%
ठाणे – ७६.५७%
मुंबई रेल्वे – ७३.१४%
विभागीय आयुक्त:
कोकण – ७५.४३%
नाशिक व नागपूर – ६२.२९%
पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक:
कोकण – ७८.८६%
नांदेड – ६१.१४%
राज्य शासनाच्या या अहवालामुळे शासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर भर देण्यात आल्याचे दिसून येते. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे विशेषतः अभिनंदन करण्यात आले आहे.